बचत व गुंतवणूक नक्की फरक काय?

बचत

  • बचत म्हणजे खर्च होणाऱ्या उत्पन्नाचा असा एक भाग की जो आपल्या आवश्यकतांवर खर्च न करता साठवून ठेवला जातो.
  • बचतीमध्ये आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो. ही एक अल्पकालीन प्रक्रिया आहे.
  • बचतीमध्ये जोखीम (Risk) नाही व लाभही “अल्प” असतो. बचत ही “सवय” आहे. बचतीचा परामर्श/आढावा घ्यावा लागत नाही.
  • बचत केव्हाही करता येते. बचतीचे पैसे केव्हाही परत मिळू शकतात.

गुंतवणूक

  • गुंतवणूक म्हणजे अशी एक प्रक्रिया की ज्याद्वारे आपण फायदा मिळवतो. पण गुंतवणुकीतून फायदा घ्यायचा असल्यास विक्रीची प्रक्रिया करावी लागते.
  • गुंतवणुकीची सुरुवात तरुणपणी केल्यास फायदा चांगला होतो.
  • गुंतवणूक ही मालमत्ता, समभाग, म्युच्युअल फंड व वस्तू बाजारपेठेत होते.
  • गुंतवणुकीस लवकर सुरुवात करा. गुंतवणुकीची रक्कम महिन्याच्या खर्चात धरावी. जास्त परतावा मिळेल म्हणून धोकादायक गुंतवणूक करू नये.

सामान्य माणसाचे २ आवडते गुंतवणूकचे विषय म्हणजे पोस्ट खाते आणि बॅंक!

पोस्ट खाते

  • मासिक उत्पन्न योजना (.%)
  • आवर्ति ठेव (.%)
  • राष्ट्रीय बचत पत्रे (.%)
  • मुदत ठेवी : १/२/३/५ वर्ष (७ ते ७.%)
  • ज्येष्ठ नागरिक बचत (८.%)
  • पीपीएफ : सार्वजनिक भविष्य निधी (८%)
  • किसान विकास पत्र (७.%)

बँक ठेवी

  • ३० दिवस ते ५ वर्षे
  • व्याजदर ५% ते ७.%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी १/ % पर्यंतजास्त
  • उद्गमकर कपात (TDS) केली जाते.
  • फक्त रु. १ लक्ष पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण

इतकी वर्षे सर्वसामान्य गुंतवणूकदार हा पोस्ट ऑफिस, बँक व सर्वसाधारण विमा योजना यापलीकडे जाऊन गुंतवणूक करता येते यासंबंधी कायम अनभिज्ञ राहिले व त्यामुळे त्यानेबचती पलीकडे जाऊन गुंतवणूकीतून फायदा घेता येतोही बाब लक्षात घेतलीच नाहीपोस्ट ऑफिस बँका मधील ठेवींवर दिवसेंदिवस व्याजदर एवढे कमी होत आहे की फक्त (Inflation) महागाईवाढी इतकीच मिळकत होत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाहीशिवाय बँका तर त्यातच उद्गमस्थानी करकपात करतात (TDS) म्हणूनचम्युचुअल फंडातील चांगल्या योजना, शेअरबाजारातील चांगल्या संधी याचा विचार सामान्यातल्या सामान्य माणसाने करावा हीच अपेक्षा.

एक एप्रिल २०१७ पासून व्याजदरामध्ये 0.१% कपात होत आहे