एचडीएफसी बॅंक लि.ने 6 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला आहे. त्यामुळे टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर हा टप्पा गाठणारी एचडीएफसी बॅंक ही तिसरीच भारतीय कंपनी ठरली आहे. सध्या रिलायन्सचे बाजारमूल्य 8 लाख 50 हजार कोटी रुपये आहे. तर टीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख 48 हजार कोटी रुपये इतके आहे.

आज दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात एचडीएफसी बॅंकेचा शेअर 2.67 टक्क्यांनी वधारून 2229.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. यामुळे एचडीएफसी बॅंकेचे बाजारमूल्य 6 लाख 6 हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीएफसी बॅंकेचे चांगले तिमाही निकाल आणि थकित कर्जाच्या संदर्भातील योग्य स्थिती यामुळे बॅंकेचा शेअर वधारतो आहे. गुंतवणूकदारांचा कलही या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे.

अभिप्राय द्या!