एफएमसीजी आणि खाद्य पदार्थ क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा समावेश राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी एचपीसीएलची जागा पटकावत ब्रिटानियाने निफ्टीमध्ये जागा पटकावली आहे. यामुळे एचपीसीएल मात्र निफ्टीमधून बाहेर पडणार आहे. 29 मार्चपासून ब्रिटानियाचा समावेश निफ्टीमध्ये होणार आहे. त्यामुळे ब्रिटानियाच्या शेअरने उसळी घेतली आहे. तर एचपीसीएलच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu