सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) म्युच्युअल फंड योजनांसाठी स्वतंत्र नियामक संस्थेचा प्रस्ताव दिला आहे. म्युच्युअल फंड योजनांच्या वितरणावर आणि सल्लागारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक संस्थाच असावी असा सेबीचा प्रस्ताव आहे. सध्या म्युच्युअल फंड योजना सेबीच्या नियंत्रण कक्षेत येतात. म्युच्युअल फंड योजना आणि सल्लागार यांचे बाजारातील महत्त्व आणि संख्या वाढत चालली आहे.
28 फेब्रुवारी 2019 पर्यत म्युच्युअल फंड योजनांचे 1.24 लाख वितरक नोंदवले गेले आहेत. तर 19 मार्च 2019 पर्यत 1,136 गुंतवणूक सल्लागारांची सेबीकडे नोंदणी झाली आहे. ‘त्यामुळेच सेबीला म्युच्युअल फंड योजनांवर प्रत्यक्ष देखरेख करणे आव्हानात्मक होत जाणार आहे. त्यामुळेच यासाठी स्वतंत्र नियामक संस्थेची आवश्यकता आहे’, असे मत सेबीने व्यक्त केले आहे.
यासंदर्भात सेबीने 21 एप्रिल 2019 पर्यत सर्वसाधारण प्रतिक्रिया मागवल्या आहेत.