जागतिक बॅंकेच्या 13 व्या अध्यक्षपदावर डेव्हिड मालपास यांची निवड झाली आहे. जागतिक बॅंकेकडून कार्यकारी मंडळाकडून 63 वर्षीय मालपास यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. डेव्हिड मालपास सध्या ट्रेझरी फॉर इंटरनॅशनल अफेअर्सच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मालपास 9 एप्रिलपासून सांभाळणार आहेत. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
जागतिक बॅंकेचे आतापर्यतचे सर्व तेरा अध्यक्ष हे अमेरिकीचे आहेत. जागतिक बॅंकेचा अध्यक्षपदी असणारी व्यक्ती इंटरनॅशनल बॅंक फॉर रिकन्स्ट्रक्शन अॅंड डेव्हलपमेंट (आयबीआरडी) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन (आयडीए) यांच्या संचालक मंडळाच्याही प्रमुखपदी असते.