भारतीय शेअर बाजार हा सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील कंपन्यांसाठी चालू वर्ष फायदेकारक राहील. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता दिसू शकते. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन अस्थिरता टाळण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीचा मार्ग उत्तम राहील असा विश्वास आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे मुख्य आर्थिक सल्लागार एस नरेन यांनी इंग्रजी वृत्तसंस्था ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यामध्ये इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडात जोरदार कमबॅक केले आहे. विद्यमान सरकारच पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अनेक सर्वेमधून समोर आल्याने इक्विटीमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी 11,756 कोटी रुपये इक्विटी आणि ईएलएसएस प्रकारात गुंतवले आहेत.

अभिप्राय द्या!