आपल्या भागात अनेक पतपेढ्या चांगल्या रितीने कार्यरत आहेत. बऱ्याच पतपेढ्या कर्जमागणीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील ठेवी चालू खाते (Current Account) मध्ये ठेवतात व त्यावर त्यांना काहीही व्याज मिळत नाही. तसेच जर ही रक्कम ६ महिन्यांच्या किंवा वर्षभराच्या कालावधीसाठी Fix Deposit मध्ये ठेवली तर कर्जमागणी झाल्यावर ह्या Fix Deposits मोडाव्या लागतात किंवा त्यावर Overdraft घ्यावा लागतो व याद्वारे पतपेढ्यांचे किमान २% पर्यंत नुकसान होऊ शकते.

तथापि जर ही रक्कम G. Sec फंड किंवा Floating Rate फंड मध्ये ठेवल्यास त्यावर दरदिवशी व्याज प्राप्ती होऊ शकते व संस्थेचा फायदा होतो. साधारणतः हे व्याज ७% ते ८% पर्यंत असते. हा व्याजदर चक्रवाढ पद्धतीचा असतो हेही तितकेच महत्वाचे आहे.

तसेच वर्षातील सर्व बँक सुट्यांच्या दिवशी आपले पैसे अश्या फंडामध्ये park केले तरीही आपल्या पतसंस्थेचा आर्थिक फयदा होऊ शकेल !!

तसेच या फंडामध्ये ठेवलेली रक्कम ही एका दिवसाच्या सूचनेने केव्हाही आपल्या बँक खात्यात जमा करणेची सुविधाही आहे. म्हणजेच व्याजप्राप्ती व Liquidity हे दोन्ही फायदे संस्थेला घेता येतात.