रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीच्या शेअरची आज मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाली. आरव्हीएनएलच्या शेअरची शेअर बाजारात 19 रूपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या 19 रूपयांवरच कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात शेअर किरकोळ वाढीसह 19.05 रुपायंवर व्यवहार करतो आहे. शेअरने इंट्राडे व्यवहारात 18.60 रुपयांची नीचांकी तर 19.75 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. आरव्हीएनएलचा आयपीओ 29 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत खुला होता.
 
कंपनीने प्रत्येक शेअरसाठी प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर 0.50 पैशांची सवलत देण्यात आली होती. रेल विकास निगम ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून रेल्वे मंत्रालयच्या अंतर्गत काम करते. 
 
आयपीओच्या माध्यमातून 25 कोटी 34 लाख 57 हजार 280 शेअरची विक्री करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना किमान 780 शेअरसाठी आणि त्यानंतर 780 च्या पटीत अर्ज करणे बंधनकारक होते.  

अभिप्राय द्या!

Close Menu