दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारती एअरटेलने आपल्या आगामी 25,000 कोटी रुपयांच्या राईट्स इश्यूसाठी 24 एप्रिल ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. आगामी 25,000 कोटींच्या राईट्स इश्यू संदर्भात समभागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी एअरटेलने 24 एप्रिल ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. भारती एअरटेलला राईट्स इश्यूसंदर्भात सेबीची परवानगी याआधीच मिळाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने फेब्रुवारी महिन्यातच या प्रस्तावाला परवानगी दिली आहे.
राईट्स इश्यूमधून उभारले जाणारे भांडवल कंपनीला भविष्यात मोठ्या क्षमतेच्या नेटवर्कची बांधणी करण्यासाठी, सुविधा पुरवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित भागीदारी करून ग्राहकांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी वापरता येणार आहे. मागील महिन्यातच एअरटेलमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी सिंगटेल आणि जीआयसी सिंगापूरने 32,000 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणी योजनेत सहभागी होण्याचे आश्वासन एअरटेलला दिली आहे. सिंगटेल ही सिंगापूरमधील दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu