गृहकर्ज घेणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठा महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे कर्जदाराला पात्रता, कर्ज घेण्यापुर्वी करावा लागणारा खर्च यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. ह्या ठिकाणी अशा काही मूलभूत गोष्टींची माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकाला अनवधानाने दुर्लक्ष होणे टाळण्यास मदत होईल.

गृहकर्जासाठी पात्रता निकष
अर्जदाराने गृहकर्ज घेण्यासाठी त्याच्या/तिच्या पात्रतेचा अंदाज घेणे ही पहिली महत्त्वाची बाब आहे. पात्रतेसाठी आवश्यक दोन सर्वाधिक महत्त्वाचे निकष म्हणजे स्थिर मिळकत आणि उत्तम क्रेडिट रेटिंग. मागील क्रेडिट पेमेन्टसच्या बाबतीत अर्जदाराने हलगर्जीपणा केलेला (डिफॉल्टर) असता कामा नये. अर्जदारापाशी सर्व आवश्यक आणि पडताळणी केलेले आर्थिक दस्तऐवज उपलब्ध असले पाहिजेत.

गृहकर्जाचा खर्च
गृहकर्जावर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते. ज्यात अर्जाचे शुल्क, कर्जाच्या प्रकारानुसार कर्जाच्या रकमेच्या 1% पर्यंत प्रक्रिया शुल्क, अर्जदाराची
मिळकत आणि प्रोफाईल, यांचा समावेश आहे. मालमत्तेच्या मूल्यमापनासाठी तांत्रिक मूल्यमापन शुल्क आकारले जाते, त्याचबरोबर मालमत्तेच्या दस्तऐवजांची छाननी करण्यासाठी कायदेशीर शुल्क आकारण्यात येते. त्याशिवाय कर्ज मंजूर केल्यानंतर प्रशासकीय शुल्क भरावे लागते. कर्जाच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि ईसीएस मॅन्डेट कार्यान्वित करण्यासाठी अल्प दस्तऐवज शुल्क आकारले जाते.

गृहकर्जावरील करलाभ
मालमत्तेवरील कर्जावर भरलेल्या व्याजावर कर्जदार करलाभ मिळवू शकतो. मालमत्तेचा स्वत: वापर करत असल्यास व बांधकाम 5 वर्षांच्या आत पूर्ण झाले असल्यास जास्तीत जास्त रू.2 लाख वजावटीचा लाभ घेता येतो. जर ह्या कालावधीत बांधकाम पूर्ण झाले नसेल तर रू.30,000 पर्यंत रकमेचा दावा करता येतो.

दोन किंवा अधिक व्यक्तींनी गृहकर्ज घेतले असल्यास, ती प्रत्येक व्यक्ती प्रत्येकी
रू.2 लाख पर्यंत भरलेल्या व्याजावर वजावटीचा लाभ घेऊ शकते. त्याशिवाय, मालमत्तेचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास कर्जदार रू.1.5 लाख पर्यंत परतफेड केलेल्या कर्जाच्या मुद्दल रकमेवर कर वजावट मिळवू शकतो.

प्रथम खरेदी करणारा खरेदीदार, मालमत्तेची किंमत रू.50 लाख पेक्षा कमी असल्यास आणि कर्जाची रक्कम रू.35 लाख पेक्षा कमी असल्यास, भरलेल्या व्याजावर रू.50,000 इतका अधिक कर लाभ मिळवू शकतो.

प्री-ईएमआय व्याज
बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेसाठी दिलेल्या गृहकर्जासाठी प्री-ईएमआय व्याजाची तरतूद आहे. मोरॅटोरियमचा कालावधी संपल्यानंतर ईएमआय सुरू होतो. ह्या कालावधीत, ग्राहकाला वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेवर साध्या दराने व्याज आकारले जाते.

स्थिर व बदलता व्याज दर
स्थिर व्याज दर म्हणजे कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याजाचा दर बदलत नाही.
दुसरीकडे, बदलता व्याज दर म्हणजे बँकेच्या बाबतीत HFCs आणि MCLRच्याPLR (प्राईम लेंडिंग रेट) वर व्याज दर अवलंबून असतो आणि त्यात कधीही बदल होऊ
शकतो.

अभिप्राय द्या!