अर्थसंस्कार म्हणजे नक्की काय?

माझ्यासाठी या अवजड शब्दांचा अर्थ हा असा – आयुष्य जगण्यासाठी नीतिमत्तेला अनुसरून, स्वतचं कौशल्य वापरून पैसे कमावणं व त्याचा गरजेनुसार वापर करणं, वेळोवेळी इतर गरजूंना मदत करणं आणि मग पुढच्या पिढीसाठी ठेवणं.

अशा प्रकारे मिळालेली संपत्ती ही पुरून उरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान देते.  ‘मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते मी माझ्या पाल्याला देणार!’ ही मानसिकता जवळ जवळ सगळ्याच पालकांची असते. पण मुलांची खरी गरज आणि स्वतची ऐपत हे कुणी तपासतंय का? आणि जिथे पालकांना आर्थिक शिस्त नसेल तर मग मुलांना कोणते धडे मिळणार?

खालील मुद्दे तपासून आपल्यावर व आपल्या पाल्यावर आपण अर्थासंस्कर करू शकतो हे निश्चित !!

घरातल्या प्रत्येकाच्या खर्चावर अंकुश ठेवाच .

 • महिन्याच्या सुरुवातीला सगळी गुंतवणूक झाली पाहिजे आणि उरेल त्यात महिना भागवायचा.
 • महिन्याच्या शेवटी आणि पगाराच्या आधी राहिलेली रक्कमसुद्धा गुंतविली गेली पाहिजे.
 • प्रत्येक खर्चाचं बजेट ठरवा. घराच्या नियमित खर्चापासून अगदी पाणी-पुरीच्या नाश्त्यापर्यंत. बाहेर खाण्याचं तर नियोजन पाहिजेच.
 • मुलांच्या ‘पॉकेट मनी’लासुद्धा योग्य मर्यादा असू द्या. त्यांच्या हातून होणारे खर्च योग्य असल्याची शहानिशा वेळोवेळी करा.
 • स्मार्टफोनचा वापर स्वतच्या भल्यासाठी करा. नियमित खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी तो खूप उपयोगी पडतो.
 • गुंतवणूक करायला छोटी रक्कमसुद्धा पुरेशी असते. अगदी ५० रुपये जरी वाचवता आले, तरी ते बाजूला ठेवा आणि महिन्याअखेरीस गुंतवा.
 • घरामध्ये गुंतवणूक संवाद होऊ द्या. कशा प्रकारे पैसे गुंतवले की ते कसे वाढतात आणि आपल्या आर्थिक ध्येयात कसे कामी येतात हे मुलांच्या अंगवळणी पडलं पाहिजे.
 • जुगार, लॉटरी, मल्टी लेव्हल मार्केटिंगपासून लांब ठेवा आणि याबाबत मुलांनासुद्धा जागरूक करा.
 • कर्ज गरजेसाठी आणि फक्त त्यासाठीच.चैनीसाठी  कर्जाची सवय नको.
 • मुलांना पसा पुरवतानासुद्धा त्यामागचे कष्ट आणि बरोबरची जबाबदारी या दोन्ही गोष्टींची जाणीव करून द्या.
 • खरेदीला जाताना यादी बनवा आणि त्यानुसार खरेदी करा.
 • व गुंतवणुकीसाठी सल्लागाराचा सल्ला घ्याच !!

अभिप्राय द्या!