पॉलिकॅप इंडिया लिमिटेडच्या शेअरची मुंबई शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची मुंबई शेअर बाजारात 633 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.538 या इश्यू प्राइसपेक्षा 18 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.538 प्रतिशेअरप्रमाणे शेअरचे वाटप केले होते. पॉलिकॅप  इंडियाच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला. कंपनीचा आयपीओ 5 ते 9 एप्रिल दरम्यान खुला होता
 
सध्या मुंबई शेअर बाजारात पॉलिकॅप इंडियाचा शेअर 22 टक्के वाढीसह 660 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारात तो 
 661.50 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 
 
पॉलिकॅप इंडिया लिमिटेडने गुंतवणूकदारांना एका दिवसात कमावून दिले 3 हजार रुपये
आयपीओसाठी अर्ज करताना किमान 27 शेअर्ससाठी अर्ज करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपनीने आयपीओसाठी अर्ज करणार्‍या गुंतवणूकदारांना 538 रुपये प्रतिशेअर प्रमाणे 27  शेअर दिले. म्हणजेच 14526 रुपयात गुंतवणूकदारांना 27 शेअर मिळाले. आज शेअर बाजारात शेअरची नोंदणी झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या एका 538 रुपयांच्या शेअरचा भाव 660 रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रतिशेअर 122 रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच एका 27 शेअर्सच्या लॉट मागे एका दिवसात गुंतवणूकदाराला 3294 रुपयांचा फायदा झाला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu