form 16 या नावाने प्रचलित असणाऱ्या अर्जाच्या स्वरूपात प्राप्तिकर खात्याने काही बदल केले आहेत. हा अर्ज अधिक सर्वसमावेशक व तपशीलवार करून करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

नवीन बदल कोणते?

नवीन अर्जात कर्मचाऱ्यांना अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. गृहमालमत्तेपासूनचे उत्पन्न, अन्य आस्थापनांकडून मिळणारे उत्पन्न, विविध करबचत योजनांमधील गुंतवणुकीची तपशीलवार माहिती, प्राप्त झालेले विविध भत्ते तसेच अन्य स्रोतांतून झालेले उत्पन्न याची माहिती या अर्जात द्यावी लागेल. बचतीच्या योजनांमधील व्याजापोटी मिळणारी करवजावट, सवलत आणि अधिभार या माहितीसाठीही नव्या अर्जांत रकाने आहेत. नोकरदार व्यक्ती व ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही अशा व्यक्तींच्या करविवरणाच्या अर्जाची अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आहे. या करदात्यांना ३१ जुलैपर्यंत करविवरणपत्र सादर करावी लागतील.

अभिप्राय द्या!