देशातील आघाडी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी करत 5,885.12 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील वर्षी मार्चअखेर एचडीएफसी बॅंकेला 4,799.28 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विश्लेषकांनी बॅंकेला 5,805 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत बॅंकेने 5,885.12 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
बॅंकेला निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 22.8 टक्क्यांची वाढ होत उत्पन्न 13,089.50 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेच्या मालमत्तेत 19.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. एचडीएफसी बॅंकेचे नेट इंटरेस्ट मार्जिनही 4.4 टक्के आहे. थकीत कर्जासाठीच्या तरतूदीत एचडीएफसी बॅंकेने वाढ केली असून मागील वर्षीच्या 1,541.0 कोटी रुपयांवरून हा आकडा 1,889.20 कोटी रुपयांवर नेला आहे. मार्चअखेर बॅंकेचे एनपीए 1.36 टक्के होते. डिसेंबरअखेर एचडीएफसीचे एनपीए 1.38 टक्के तर मागील वर्षी याच कालावधीत 1.30 टक्के इतके होते. बॅंकेचे नेट एनपीए 0.4 टक्के आहेत.
बॅंकेच्या संचालक मंडळाने 15 रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंडसुद्धा जाहीर केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu