टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) भारतीय पोस्ट ऑफिसबरोबर अत्याधुनिकीकरणासंदर्भातील करार केला आहे. या कराराद्वारे टीसीएस अनेक पातळीवरील अत्याधुनिक सुविधा पोस्ट खात्याला उपलब्ध करून देत आहे. पुढील काही वर्षांसाठीचा हा करार आहे.
याद्वारे अत्याधुनिक डिजिटल हब, मेल आणि पॅकेजेसची डिलिव्हरी टीसीएस पोस्ट ऑफिसला उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनासुद्धा अत्याधुनिक सेवा पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय महसूलाचे नवे मार्ग शोधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण सेवांचीही पोस्ट ऑफिसमध्ये सुरूवात करून दिली जाणार आहे.
टीसीएस पोस्टामध्ये कोअर सिस्टम इंटेग्रेशनची अंमलबजावणी करणार आहे. ही एक एंटरप्राईझेस रिसोसर्स प्लॅनिंग (ईआरपी) यंत्रणा असून त्याद्वारे मेल, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआरचे कामकाज यासारख्या विभागांचे कामकाज हाताळले जाणार आहे.
टीसीएसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशभरातील दीड लाख पोस्ट ऑफिसना एकत्र जोडले जाणार आहे. त्यामुळे इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात ई-पोस्टल नेटवर्क बनणार आहे. पोस्ट ऑफिसचे सध्याचे कामकाज आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे बदल आणि अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे.