प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाने आज प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडसाठी त्यांच्या न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर करत असल्याची घोषणा केली. ही ओपन एंडेड (खुली योजना) इक्विटी स्कीम मुख्यत्वे स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेद्वारे दीर्घकाळात अधिक परतावा देऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या छोट्या कंपन्यांना शोधून त्यात गुंतवणूक केली जाणार आहे. हा एनएफओ  २२ एप्रिल रोजी खुला झाला असून ६ मे २०१९ पर्यंत खुला राहणार आहे.
 
प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात स्मार्ट ट्रिगर एनेबल्ड प्लॅन (एसटीईपी-स्टेप) आणि ऑटो ट्रिगर अशा सुविधा आहेत. बाजारपेठेत काळानुसार येणारे धोके कमी करण्यासाठी बहुविध प्रकारे गुंतवणूक करून बाजारपेठेत प्रचंड पडल्यास गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा उद्देश स्टेपमध्ये ठेवण्यात आला आहे. स्टेपही खास सुविधा आहे. ही सुविधा फक्त एनएफओ कालावधीतच उपलब्ध असेल.
 
स्टेप सुविधेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रिन्सिपल स्मॉल कॅपमधील त्यांची गुंतवणूक चार समान मासिक हप्त्यांमध्ये विभागता येईल. त्यामुळे गुंतवणूक रकमेतील फक्त २५ टक्के रक्कम थेट प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात गुंतवली जाईल आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडात गुंतवली जाईल. समभाग वितरित केल्यानंतर बाजारपेठ ३ टक्क्यांनी घसरल्यास स्टेप कार्यरत होईल आणि सुरुवातीच्या गुंतवणुकीतील २५ टक्के रक्कम आपोआप प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल. बाजारभावात कोणताही बदल झाला नाही, तर हा व्यवहार पुढील महिन्याच्या अखेरीस केला जाईल आणि प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडातून गुंतवणूक प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल.
 
ऑटो ट्रिगरमध्ये गुंतवणूकदाराला परताव्याचा लक्ष्यित दर निश्चित करता येतो. हा दर गाठला गेल्यानंतर वाढलेली रक्कम आपोआप इतर फंडांमध्ये टाकली जाते. गुंतवणूकदार आपल्या स्मॉल कॅप्समधील गुंतवणुकीत समतोल साधण्यासाठी ही सुविधा वापरू शकतात.

अभिप्राय द्या!