एसबीआय जनरल इन्शुरन्स (एसबीआयजी), या भारतातील वेगाने वाढणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीने त्यांचे नवे उत्पादन –
सायबर डिफेन्स इन्शुरन्सच्या लॉन्चची घोषणा केली आहे. हे उत्पादन व्यवसायांकरिता सायबर इन्शुरन्स देऊ करते. प्रारंभिक टप्प्यात एसएमई, मध्यम-बाजारांतील व्यापारांवर लक्ष असून मोठ्या व्यापारांनाही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे एक चपखल उत्पादन असून ‘सायबर डिफेन्स इन्श्युरन्स’ वाढत्या सायबर उल्लंघन धोक्यांमध्ये संरक्षण पुरवते. हे उत्पादन हॅकिंग हल्ले, ओळख चोरणे, संवेदनशील माहिती उघड करणे आणि व्यापारी अडथळे यांसारख्या मुख्य सायबर असुरक्षिततेविरुद्ध संरक्षणाच्या दृष्टीने डिझाईन केले आहे.
अलीकडच्या काळात डिजीटल प्रगती झपाट्याने होत असताना सर्वच प्रकारच्या आणि आकाराच्या व्यवसायांमध्ये सायबर जोखीमही वाढली. व्यापारामध्ये बहुसंख्य व्यापारी हे सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत पुरेशी काळजी घेत नाही, याच थिअरीचा अभ्यास सायबर हल्लेखोर करतात. ते मोठ्या व्यापारांवर होणाऱ्या सायबरहल्ला तंत्राचा अभ्यास करतात आणि त्याचा अवलंब तुलनेने लहान असलेल्या व्यवसायांवर करतात. यामुळे अशाप्रकारच्या आपतकालीन परिस्थितीत व्यापारांनी सज्ज राहणे अतिशय महत्त्वाचे ठरते.