स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. डोअर स्टेप बँकिंग असे या नवीन सेवेचे नाव आहे. 70 वर्षांवरील  ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा असून कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा यात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झाली आहे.
 
या योजनेअंतर्गत, कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप अशा 6 सुविधांचा समावेश आहे. 
 
सर्वात महत्वाचे म्हणजे, केवायसी झालेले खातेधारकच डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय तुमचा वैध मोबाइल नंबर बँकेत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचे घर एसबीआय शाखेपासून 5 किमीच्या आत असायला हवे. 
 
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आर्थिक व्यवहार असेल, तर प्रति व्यवहार 100 रुपये आणि आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी 60 रुपये द्यावे लागतील.तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन रजिस्टर करावे लागेल. दिव्यांग व्यक्तींना मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागेल. अधिक माहिती https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services या वेबसाईटला भेट देऊ शकता. 

अभिप्राय द्या!