स्टेट बॅंक ऑफ इंडिया बॉन्डच्या माध्यमातून 17,000 कोटी रुपये (2.5 बिलियन डॉलर) उभारणार आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. परदेशातील स्टेट बॅंकेच्या व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बॉन्डद्वारे उभारलेल्या भांडवलाचा विनियोग केला जाणार आहे. 
 
बॅंकेच्या केंद्रीय मंडळाच्या कार्यकारी समितीच्या 24 एप्रिल 2019 ला झालेल्या बैठकीत भांडवल उभारण्याच्या प्रस्तावाला परवानगी देण्यात आली आहे. पल्बिक ऑफरद्वारे किंवा खासगी पद्धतीने एक किंवा अनेक टप्प्यांमध्ये स्टेट बॅंक हे भांडवल उभारणार आहे. मुख्यत: अमेरिकी डॉलरच्या माध्यमातून हे भांडवल उभारले जाणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी हा प्रस्ताव असणार आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu