आयटीआय म्युच्युअल फंडाने नवा आयटीआय मल्टी कॅप फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड डाव्हर्सिफाईड इक्विटी फंड आहे. या फंडाचा एनएफओ 25 एप्रिलपासून खुला झाला असून त्याची अंतिम मुदत 09 मे 2019 आहे. या फंडाचे व्यवस्थापन जॉर्ज हेबर जोसेफ आणि प्रदिप गोखले करणार आहेत. डाव्हर्सिफाईड पोर्टफोलिओद्वारे गुंतवणूक करून दिर्घकालीन परतावा मिळवणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे.
या फंडाद्वारे इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडाद्वारे 65 ते 100 टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित प्रकारात केली जाणार आहे. तर 0 ते 35 टक्के गुंतवणूक डेट आणि मनी मार्केट या गुंतवणूक प्रकारात केली जाणार आहे.
या योजनेचे गुंतवणूकीचे मुख्य सूत्र हे मुख्यत: तीन घटकांवर आधारित असणार आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी, व्यवसायाची गुणवत्ता आणि लो लेवरेज या तीन घटकांवर आधारित पोर्टफोलिओ व्यवस्थापन केले जाणार आहे. याला एसक्युएल गुंतवणूक सूत्र असे म्हणतात.
‘एसक्युएल गुंतवणूक सूत्र भारतात नवीन असले तरी जगभरात हे मान्यताप्राप्त सूत्र आहे. याद्वारे गुंतवणूकदारांसाठी दिर्घ काळात संपत्ती तयार केली जाते.

अभिप्राय द्या!

Close Menu