ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) म्हणजेच सर्वसामान्यांसाठीची ‘ऐनी टाईम मनी’ मशीन आता ‘ऐनी टाईम हेल्थ’ (एटीएच) झाली आहे. या एटीएच मधून तुम्हाला अवघ्या तीन मिनिटांमधे आरोग्य विमा / हेल्थ इन्शुरन्स घेता येणार आहे. मॅक्स बुपा लाईफ इन्शुरन्स या कंपनीने ही (एटीएच) दाखल केली आहेत. यासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेबरोबर करार केला असून देशभरातील एचडीएफसी बँकेच्या शाखांमध्ये ही एटीएच मशीन उपलब्ध असणार आहे.
मॅक्स बुपा लाईफ इन्शुरन्सने या प्रकारच्या मशिन्स 2017 मध्येच सादर केल्या होत्या मात्र आता अधिक आक्रमकपणे बाजारात उतरण्यासाठी त्यांनी एचडीएफसी बँके बरोबर करार केला आहे.
या मशीनचा वापर करून आरोग्य विमा घेणे सहज शक्य होणार आहे. या मशीनमध्ये इमेल आयडी, मोबाईल नंबर सारखी काही जुजबी माहिती विचारली जाते. त्यानंतर पुढील 3 मिनिटात आरोग्य विमा संबंधातील योजना सुचविली जाते. या मशिनमधून ग्राहकाला आपले बॉडी मास इंडेक्स, ब्लड प्रेशर यांसारख्या गोष्टी लगेच समजतील.