येस बॅंकेला आश्चर्यकारकरित्या 1,506.64 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत बॅंकेने तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बॅंकेला 1,179.44 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. विश्लेषकांनी बॅंकेला 1,050 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता.

थकीत कर्ज आणि आकस्मिक खर्चासाठी केलेल्या तरतुदीत मोठी वाढ केल्याने येस बॅंकेने तोटा नोंदवला आहे. चौथ्या तिमाहीअखेर बॅंकेने तरतुदींसाठी 3,661.70 कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत हाच आकडा 399.64 कोटी रुपये इतका होता. गुंतवणूकदारांच्या परवानगीनंतर बॅंकेच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति शेअर लाभांशाचा प्रस्ताव दिला आहे.

बॅंकेच्या मालमत्तेत चांगलीच घसरण झाली आहे. एकूण थकित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) डिसेंबर महिन्याअखेर 2.10 टक्क्यांवर होते त्यात वाढ होऊन ते 3.22 टक्क्यांवर पोचले आहे. मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत हेच प्रमाण 1.28 टक्के होते. तर चौथ्या तिमाहीअखेर निव्वळ थकित कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण 0.64 टक्क्यांवरून वाढून 1.86 टक्क्यांवर पोचले आहे. येस बॅंकेचे एकूण थकित कर्ज 2,626.80 कोटी रुपयांवरून 7,882.56 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर निव्वळ थकित कर्ज 1,312.75 कोटी रुपयांवरून 4,484.85 कोटी रुपयांवर पोचले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu