राजकीय चक्रातील सध्याचा काळ असा असतो, ज्यावेळी भावना शिगेला पोहोचलेल्या असतात आणि अपेक्षांचा उन्माद आलेला असतो. निवडणुका जवळ आलेल्या असताना तुम्ही मार्केटमधील तुमच्या परफॉर्मन्ससाठी जोमदार तयारी करत आहात का? या ५ वर्षांच्या प्रक्रियेबद्दल अंदाज वर्तवणं अशक्य असतं, ज्यामुळे गुंतवणुकदार खालीलपैकी भूमिका निश्चित करतात:
 
–          सगळ्या अनिश्चिततेपासून दूर राहणे. मार्केटपासूनच दूर राहणे.
 
–           शांत राहून निवडणूक निकालांनंतर गुंतवणूक करणे.
 
–         जो पक्ष सत्तेत येतो त्याला अनुसरून गुंतवणुकीचे पर्याय निवडतात.
 
–          मतदानाआधीच गुंतवणुकीचे पैसे रोख करून घेतात.
 
गुंतवणुकदारांना हा काळ खूपच चिंतेचा वाटत असतो. इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येतं की, या आधीच्या निवडणुकीवेळी एकतर मार्केट खूप वर गेलेलं असतं किंवा ते कोसळलेलं असतं पण काहीही झालं असलं तरीही गुंतवणुकदारांना मार्केटमध्ये सातत्याने बदल झाल्याचं बघायला मिळतं. तरीही प्रयत्न केले जातातच. पण कायमच तसं करणं गरजेचं असतं का?
 
 चला गुंतवणूकदारांची संकोची वृत्ती समजवून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांतील निवडणुकांच्या काळात मार्केट कसं होतं याचा आढावा घेऊया. २००४ मध्ये अनपेक्षितपणे केंद्रात यूपीएचं सरकार आलं, तेव्हा बीएसईचा सेन्सेक्स एका दिवसात ११ टक्क्यांनी कोसळला होता. २००९च्या निवडणुकीवेळी जेव्हा यूपीए सरकारने पूर्ण बहुमत मिळवलं होतं, तेव्हा एका दिवसात मार्केटने दोनदा उसळी मारली होती. पण मार्केटमध्ये झालेले हे बदल तात्पुरते होते. थोडक्या काळासाठीच्या बदलांची गोष्ट वगळता ५ वर्षांतील रिटर्न जवळ-जवळ १५ टक्क्यांपर्यंत होते.
 
 गेल्या काही वर्षांपासून भारतात संपूर्ण बहुमतातलं सरकार तसंच आघाडीचं सरकार अशी संमिश्र स्थिती होती. मार्केटमध्ये प्रत्येक निवडणुकीवेळी वाढ नोंदली गेली, पण प्रत्येक सरकारच्या कार्यकाळातून काय मिळालं तर १९८०पासून सरासरी जीडीपीची वाढ ६.२ टक्के राहिली. म्हणजे, जर मार्केटची दरवर्षी ६ टक्के वाढ झाली असेल देशात कोणतं सरकार आहे याचा मार्केटवर काहीही परिणाम होत नाही.
 
जर तुम्ही म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याबाबत विचार करत असाल किंवा असलेली गुंतवणूक म्युच्युअल फंडांत ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमचं गुंतवणुकीचं ध्येय निश्चित करून रचनात्मक पद्धतीने तुमच्या फंडांची निवड करा.
 
 एखाद्या म्युच्युअल फंडाची निवड करताना ज्या फंड मॅनेजरचा पोर्टफोलिओ न्यूट्रल आहे अशाची निवड करा. न्यूट्रल पोर्टफोलिओ म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे की, जेव्हा मार्केट योग्य असतं तेव्हा तो पोर्टफोलियोही योग्य असेल. पण सामान्यपणे तो पोर्टफोलिओ स्वत: एखाद्या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या परिस्थितीशी जुळवून घेत नाही. तो फंड राजकीय घडामोडी आणि निवडणुका याबाबत न्यूट्रल असतो, जो केवळ चांगल्या कंपन्या आणि चांगल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. हे सहाजिकच आहे, पण मग तुम्ही हे कसं ओळखणार की हा फंड न्यूट्रल आहे की नाही? त्या कंपन्यांच्या आधीच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि त्या कंपनीने कोणत्या उद्योगांत पैसे गुंतवले आहेत ते पहा. जर त्या कंपनीची गुंतवणूक वेगवेगळ्या सरकारांच्या काळात आणि अर्थ व्यवस्थेच्या विविध परिस्थितींमध्ये टिकून राहिली असेल तर तुम्ही जिंकलात. जर त्या कंपनीने एखाद्या विशिष्ट सरकारच्या काळात अप्रतिम काम केलं आहे आणि दुसऱ्या पक्षाच्या सरकारच्या काळात त्यांचे काम खाली घसरले तर तुम्ही अशा कंपनीत या घडीला गुंतवणूक करू नये.
 
 कमी काळासाठीची गुंतवणूक न करणं महत्त्वाचं. थोड्या काळासाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये तुमच्या अपेक्षेच्या काळात किंवा अनपेक्षितपणे मार्केटची अवस्था कशी असेल याचा भरवसा नसतो. त्यामुळे कदाचित तुम्हाला तोटा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला मार्केट स्वत:हून योग्य स्थितीत येण्यासाठी तसेच नव्या सरकारची धोरणं व प्रशासन स्वीकारण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
 
 सध्याच्या परिस्थितीत मार्केट पेचात टाकणारे झाले आहे, त्यामुळे तुम्ही एसआयपींच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही ३ ते ५ वर्षांसाठी एसआयपी करता तेव्हा त्या काळात मार्केटमधील उसळी आणि नीचांकी पातळी यांची सरासरी साधली जाते. अशाप्रकारे तुम्ही मार्केटच्या अस्थिरतेचा परिणाम टाळू शकता आणि तुमचा तोटा होण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.
चिंता सोडा आणि सरकारच्या नव्हे तर कंपन्यांच्या वाढीकडे पाहून म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करा. तरीही तुमच्या भावनांमुळे सावधानता वाटत असली तरीही भावनिक किंवा स्वयंस्फूर्तीने येणारे निर्णय टाळा. निवडणुकांकडे लक्ष देऊ नका. फंडांकडे लक्ष द्या. आनंदी गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!

अभिप्राय द्या!

Close Menu