कोटक महिंद्रा बॅंक या खासगी क्षेत्रातील बॅंकेने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेला चौथ्या तिमाहीत 1,407.8 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता बॅंकेच्या नफ्यात 25 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत कोटक महिंद्रा बॅंकेने 1,124 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. 

अभिप्राय द्या!