पैशांच्या तरलतेच्या मुद्द्यावरून संकटात सापडलेल्या एनबीएफसींपुढचे (बिगर बँकिंग वित्त संस्था) मोठे संकट टळले आहे. मात्र परिस्थिती पूर्व पदावर यायला 12 ते 18 महिने लागतील असा आशावाद एचडीएफसी बँकेच्या आदित्य पुरी यांनी व्यक्त केला आहे. ब्लूमबर्ग या इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नियामक संस्था आरबीआय आणि सरकार यांच्या प्रयत्नामुळे भारतात लेहमन ब्रदर्स सारखी परिस्थिती उदभवली नाही. वेळीच नियामक संस्थांनी केलेला हस्तक्षेप आणि मालमत्ता विक्रीच्या माध्यमातून पैशांची तरतूद करणे सोपे झाले. त्यामुळे आयएल अँड एफएस सारखी देशातील मोठ्या एनबीएफसीला सावरणे सोपे झाले.
पैशाच्या तरलतेच्या मुद्द्यामुळे आयएल अँड एफएस संकटात आल्यानंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. सेन्सेक्स तब्बल 3000 अंशांनी घसरला होता. त्याचबरोबर म्युच्युअल फंड क्षेत्राला देखील मोठा बसला होता.