एफएमसीजी क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने (एचयूएल) चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 14 टक्क्यांनी वाढ होऊन कंपनीला 1,538 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी कंपनीला चौथ्या तिमाहीत 1,351 कोटींचा नफा झाला होता.
एचयूएलच्या एकूण उत्पन्नात देखील 9 टक्क्यांनी वाढ होऊन 9,945 कोटींची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे कंपनीच्या उत्पादन विक्रीत 7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीने आपल्या शेअर धारकांना खुशखबर देत 13 रुपये प्रति शेअर इतका लाभांश जाहीर केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu