मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची उपकंपनी असलेली अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे नाव आता “मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड” किंवा मोतीलाल ओसवाल हे दोन शब्द असलेले कोणतेही नाव स्वीकारण्याचा प्रस्ताव अस्पायर होम फायनान्सच्या संचालक मंडळाने नुकताच सादर केला.
 
अस्पायर होम फायनान्सच्या सर्वसाधारण सभेत तसेच नियामक मंडळाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कंपनीचे नाव बदलले जाणार आहे. अस्पायर होम फायनान्सला नॅशनल हाऊसिंग बँकेकडून एक मे 2019 रोजी नाव बदलण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे. प्रस्तावित नावासाठी आता केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी विभागाकडे अर्ज दाखल केला जाणार आहे. सर्व प्रकारच्या मान्यता मिळताच कंपनीचे नाव बदलले जाणार आहे. त्यानंतर ‘मोतीलाल ओसवाल होम लोन्स’  या ब्रॅण्डतंर्गत मोतीलाल ओसवाल समूह गृहकर्ज वितरित करणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu