दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी, भारती एअरटेलने मार्चअखेर 107.20 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. कंपनीच्या नफ्यात आश्चर्यकारकरित्या 24.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने दमदार कामगिरी करताना 2,022 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. विश्लेषकांचे अंदाज चुकवत कंपनीने नफा कमावला आहे. विश्लेषकांनी भारती एअरटेलला 966 कोटी रुपयांचा तोटा वर्तवला होता. कंपनीच्या एकूण नफ्यात 50.57 टक्क्यांची वाढ होत तो 576.10 कोटी रुपयांवर पोचला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu