येस बॅंकेच्या कर्जरोख्यांच्या पतमानांकनात आयसीआरए या क्रेडिट रेटिंग एजन्सीने घट केली आहे. येस बॅंकेचे जवळपास 3,632 कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात आहेत. या कर्जरोख्यांमध्ये जवळपास 32 डेट म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूक केलेली आहे. येस बॅंकेच्या दिर्घकालीन बॉन्डच्या संदर्भात आयसीआरएने नकारात्मक शेरा दिला आहे. भांडवली पुरवठ्यात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर येस बॅंकेच्या बॉन्डच्या पतमानांकनात घट करण्यात आली आहे. 
 
याआधी आयसीआरएने येस बॅंक लि.च्या दिर्घकालीन पतमानांकनात 28 नोव्हेंबर 2018 ला घट करत नकारात्मक शेरा दिला होता.

अभिप्राय द्या!

Close Menu