आर्थिक महासत्तेची केंद्रे असलेल्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरुवात झाली. यामुळे चीनमधील तब्बल 200 अब्ज डॉलर्सच्या मालावर 25 टक्के आयात कर आकारण्यात आला आहे. याअगोदर देखील जुलै 2018 मध्ये चीनमधून येणाऱ्या 200 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर 25 टक्के आयात कर आकारण्यात येत आहे. यामुळे आता एकूण 400 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर परिणाम होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन आयातकराची कराची घोषणा 5 दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर चीनचे उपाध्यक्ष ली हे अमेरिकेच्या  उच्च्पदस्थांची चर्चा करण्यासाठी अमेरिकेला दाखल गेले होते. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आयात कराच्या अंमलबजावणीमुळे चीनमधून निर्यात होणाऱ्या तब्बल 5700 वस्तू महाग होणार आहेत. त्यात इंटरनेट मॉडेम, राउटर आणि इतर डेटा ट्रांसमिशन डिव्हाइसेस संबंधीचे उद्योग क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu