पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रोने (एल अँड टी)  चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने जानेवारी ते मार्च तिमाहीत 3,418 कोटींचा निव्वळ नफा नोंदविला आहे. मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीचे तुलनेत (3,167) त्यात 7.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने 18 रुपये प्रति शेअर प्रमाणे लाभांश जाहीर केला आहे.
संपूर्ण वर्षभराचा विचार करता आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये कंपनीला 1लाख 41 हजार कोटींचा नफा झाला आहे. तर निव्वळ नफा 8,905 कोटी असून 207-18 च्या तुलनेत त्यात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu