देशातील आघाडीची मालमत्ता तारण कर्जदार (मॉर्टगेज लेंडर) एचडीएफसीने (हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन) आज आपले तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीला जानेवारी ते मार्च तिमाहीत   निव्वळ नफ्यात तब्बल 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2,861.58 कोटी रुपये इतका आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2,256.68 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
एचडीएफसीच्या एकूण उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 11,586.58 कोटी आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 9,322.36 कोटी रुपये इतका होता.
कंपनीच्या दमदार कामगिरीनंतर संचालक मंडळाने भागधारकांना प्रतिशेअर 17.50 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu