एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘आयटीसी’ने चौथ्या तिमाहीत 3,482 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीने नफ्यात 18.73 टक्क्यांची दणदणीत वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ‘आयटीसी’ने 2,932.71 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. विश्लेषकांनी कंपनीला 3,201 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता. कंपनीच्या महसूलातही चांगली वाढ झाली आहे.

आयटीसीचा महसूल 10,586.80 कोटी रुपयांवरून वाढून 12,206 कोटी रुपयांवर पोचला आहे. मात्र कंपनीच्या मार्जिनमध्ये घट होत ती 39.1 टक्क्यांवरून 31.8 टक्क्यांवर पोचली आहे. आयटीसीच्या सिगारेट विक्रीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. सिगारेट खप मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीत 4,936 कोटी रुपये होता. तो वाढून 5,486 कोटी रुपयांवर पोचला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 5.75 रुपये प्रति शेअरच्या डिव्हिडंडचा प्रस्ताव दिला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu