आघाडीची औषध निर्मिती कंपनी, ल्युपिन फार्माने 31 मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत 289.6 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ल्युपिनला 783.5 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 4,033.8 कोटी रुपयांवरून वाढून 4,406.3 कोटी रुपयांवर पोचला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची उत्तर अमेरिकेतील विक्री 5,592.4 कोटी रुपयांवर पोचली आहे.
त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 5,893.9 कोटी रुपये इतकी होती. ल्युपिनचा उत्तर अमेरिकेतील खप, कंपनीच्या एकूण जागतिक खपाच्या 34 टक्के इतका आहे. उत्तर अमेरिकेतील विक्रीत चौथ्या तिमाहीत 22.8 टक्क्यांची वाढ होत ती 1740.6 कोटी रुपयांवर पोचली आहे. आज दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात ल्युपिनचा शेअर 779.05 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.

अभिप्राय द्या!

Close Menu