टाटा समूहातील एका मोठ्या घडामोडीत, टाटा केमिकल्सचा कन्झ्युमर उत्पादनांचा व्यवसाय टाटा ग्लोबल बेवरेजेस लि. कडे हस्तांतरित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. टाटा ग्लोबल बेवरेजेस लि. आणि टाटा केमिकल्स लि. यांच्या संचालक मंडळाने स्वतंत्र घेतलेल्या बैठकांमध्ये हा निर्णय घेतला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या व्यवसाय हस्तांतरणाच्या योजनेंअतर्गत ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
या फेरबदलानंतर टाटा केमिकल्सच्या एका शेअरच्या बदल्यात टाटा ग्लोबल बेवरेजेसचे 1.14 शेअर गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. फेरबदलाच्या प्रक्रियेनंतर टाटा ग्लोबल बेवरेजेसचे नवे नाव टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स असे असणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu