बजाज फायनान्सने तडाखेबंद कामगिरी करत 1,114 कोटी रुपयांचा भरघोस नफा कमावला आहे. मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत बजाज फायनान्सच्या नफ्यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 743 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी ते मार्च 2019 या कालावधीत कंपनीला 4,887.76 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी कंपनीने 3,424.99 कोटी रुपयांच्या महसूलाची नोंद केली होती. 
 
मार्च 2019 अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात बजाज फायनान्सने एकूण 3,890 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे

अभिप्राय द्या!

Close Menu