डिजिटल पेमेंटसाठी ओळखली जाणारी देशातील आघाडीची कंपनी पेटीएमने आपल्या सेवा विस्तारायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पेटीएमने आता क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. यासाठी बँकेने सिटी बँकसोबत भागीदारी केली असून ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’ असे या कार्डाचे नाव आहे. क्रेडिट कार्डाच्या कोणत्याही व्यवहारावर 1 टक्के कॅश बॅक देणारे हे देशातील पहिलेच कार्ड आहे.
 
पेटीएमच्या ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना ए कार्ड घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. ग्राहकांना पेटीएम फर्स्ट कार्डसाठी वर्षाला 500 रुपये भरावे लागणार आहे. मात्र वर्षाला ५० हजार रुपयांचे व्यवहार करणाऱ्याला ही माफ केली जाईल. प्रत्येक महिन्याला कार्डची मर्यादा एक लाख रुपये असेल.
 
महत्वाचे कार्ड देताना ग्राहकांना पेटीएमच्या प्रोमोकोड्सची ऑर देण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत पहिल्या चार महिन्यात ग्राहकाला 10 हजार रुपयांचे प्रोमो कोड्स मिळणार आहेत.
 
याअगोदर सप्टेंबर 2017 मध्ये पेटीएमने डेबिट कार्ड लाँच केले होते. देशात डिजिटल व्यवहार करताना क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ही बाब हेरून पेटीएमने आपले क्रेडिट कार्ड आणले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu