इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (आयओसी) मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत 6,099 कोटी रुपयांचा भरघोस नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 5,218 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
विश्लेषकांचे अंदाज चुकवत इंडियन ऑईलने चांगली कामगिरी केली आहे. विश्लेषकांनी इंडियल ऑईलला 1,609.4 कोटी रुपयांच्या तोट्याची शक्यता वर्तवली होती. तर काही विश्लेषकांना नफ्यात मोठी घट अपेक्षित होती.
कंपनीने चौथ्या तिमाहीत 1लाख 45 हजार 531 कोटी 78 लाख रुपयांचा महसूल कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कमावलेल्या 1,36,964.20 कोटी रुपयांच्या महूसूलापेक्षा त्यात 6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu