शैक्षणिक कर्जाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. शक्यतो पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँका, एनबीएफसीज, यांबरोबरच अनेक स्टार्टअप कंपन्या विद्यार्थ्यांना कर्जे देत असतात. यामध्ये विद्यार्थ्याने निवडलेल्या कोर्सचे शुल्क आणि होस्टेल किंवा पुस्तके यांसारख्या घटकांचा विचार करून कर्जे दिली जातात. मात्र विद्यार्थ्यांना दैनंदिन पातळीवर आवश्यक असणाऱ्या खर्चाचा ‘पॉकेटमनी’चा विचार होत नाही. नेमकी हीच बाब ओळखून मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थी वर्गावर लक्ष केंद्रित करून अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत झाली आहेत.
 
तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांची खर्च करण्याची पद्धत यांसारख्या विविध बाबींचा विचार करून नवनवीन सर्जनशील स्टार्टअप कंपन्या या व्यवसायातील जोखीम आणि कमी नफ्यावर आधारित व्यवसायाचे मॉडेल घेऊन आल्या आहेत. विद्यार्थी आणि नुकत्याच पदवीधर झालेल्या तरुणांना नोकरी मिळेपर्यंत आवश्यक असणाऱ्या खर्चाचा विचार करून 200 रुपयांपासून ते 30 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची कर्जे देण्यावर या कंपन्यांचा भर आहे. 
 
mPokket, KrazyBee, SlicePay, Udhaar सारखी अनेक स्टार्टअप्स मागील तीन ते चार वर्षात या व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहेत.

अभिप्राय द्या!