इक्रा (आयसीआरए) ऑनलाईनने नवा क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित पोर्टफोलिओ ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंग करणारा म्युच्युअल फंड ट्रॅकर बाजारात आणला आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या म्युच्युअल फंड ट्रॅकरमुळे आर्थिक सल्लागार, वितरक आणि वेल्थ मॅनेजरना मोठाच फायदा होणार आहे. या ट्रॅकरमुळे फंड सल्लागारांना महत्त्वाच्या माहितीचे विश्लेषण तसेच फंडाची हाताळणी करताना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहे.
नवा म्युच्युअल फंड ट्रॅकर संगणक, टॅबलेट्स आणि स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. देशातील म्युच्युअल फंडात होत असलेली मोठी गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात दुवा साधण्याचे काम म्युच्युअल फंड ट्रॅकर करणार आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या ट्रॅकरची रचना सल्लागारांना सोप्या पद्धतीने हाताळता येईल अशी आहे. खूप मोठ्या प्रमाणातील ट्रॅन्झॅक्शनसुद्धा हे टूल सक्षमपणे हाताळते.
यामध्ये ऑटो अपडेट ट्रॅन्झॅक्शन, इन्व्हेस्टर मर्जिंग, फोलिओ ट्रान्स्फर, एकाच लॉग इनद्वारे सर्व गुंतवणूक एकाच वेळी, कुठूनही हाताळता येण्याची सुविधा, वेल्थ मॅनेजर डॅशबोर्ड, आरएम डॅशबोर्ड, एजंट डॅशबोर्ड, इन्व्हेस्टर डॅशबोर्ड, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट, कॅपिटल गेन रिपोर्ट, अकाऊंट स्टेटमेंट यासारख्या असंख्या उपयुक्त सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.