इक्विटी किंवा बॉण्ड्स पर्यंतच गुंतवणुकीची मर्यादा असलेल्या म्युच्युअल फंड क्षेत्राला आता गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यापुढे म्युच्युअल फंडांना सोने, चांदी, कॉपर, झिंक सारख्या कमॉडीटीज मध्ये देखील गुंतवणूक करता येणार आहे. नियामक संस्था सेबीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, म्युच्युअल फंडांना एक्सचेंज ट्रेडेड कमॉडिटी डेरीव्हेटीव्ह्‌ज (ETCD) मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
 
म्युच्युअल फंड कंपन्यांना ETCD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यासाठी वेगळ्या फंड व्यवस्थापकाची नेमणूक करावी लागणार आहे. हायब्रीड योजनेच्या माध्यमातून ही गुंतवणूक उपलब्ध असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही योजेनमध्ये कमॉडिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा 10 टक्के असेल.
 
ETCD अंतर्गत म्युच्युअल फंड योजनेत तात्पुरत्या कालावधीसाठी/ शॉर्ट टर्म गुंतवणूक करता येणार नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीचाच पर्याय यापमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच विशिष्ट कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करताना ‘शॉर्ट पोझिशन’ घेता येणार नाही. ‘बाय पोझिशन’ मध्येच ही गुंतवणूक असणार आहे. त्याचबरोबर, गोल्ड ईटीएफ योजना वगळता कोणतीही कमोडिटी स्वतःजवळ बाळगता (फिजिकल गुड्स) येणार नाही.

अभिप्राय द्या!

Close Menu