तुमच्या मुलाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही गोष्टींसह तुम्ही सुरुवात करू शकता:

●        बचतीचे महत्त्व: मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्यास प्रोत्साहन द्या. गरज आणि इच्छा यातील फरक त्यांना स्पष्ट करून सांगा. उदाहरणार्थ, आईला वाढदिवसानिमित्त घेण्याची भेटवस्तू किंवा डिसनीलॅण्डमधील खरेदी यातील फरक सांगा. यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य होतील. दिलेल्या कालावधीत विशिष्ट रकमेची बचत केल्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलाला बक्षीस देऊ शकता. असे उद्दिष्ट निश्चित करून दिल्यामुळे मुले सर्व प्रकारच्या पैशाकडे समान आदराने बघतील. मुलांच्या सर्व खर्चाची नोंद ठेवणारे रंगीत शीट, लहान मुलांसाठी पासबुक या काही मार्गांनी तुम्ही त्यांना केलेल्या खर्चाची नोंद ठेवण्याची सवय लावू शकता.

●        बँकिंग: मुलांना बँकिंग तसेच बँकिंग साधनांची माहिती करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडणे. त्यांना बँकेत घेऊन जा आणि पैसे कसे भरायचे हे त्यांना दाखवा. चेक, चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड आणि अकाऊंट स्टेटमेंटसारख्या बँकिंग साधनांशी त्यांचा परिचय करून द्या. मुलांना एखाद्या एटीएममधून पैसे काढू देण्यास कचरू नका, त्यांना मुलभूत आर्थिक धडे घेण्यासाठी नवीन अनुभव घेऊ द्या. मुलांना बरेचदा क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डमधील फरक समजत नाही. त्यांना हा फरक समजावून देण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे दोन्ही कार्डांचा वापर करून केलेली खरेदी त्यांना दाखवणे. क्रेडिट कार्डाची तीव्रता व प्रक्रिया त्यांना समजावून सांगा. स्टेटमेंट आले की, क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास किती मजबूत दंड भरावा लागतो हे सांगा.

●        विमा आणि गुंतवणूक: मुलांशी गुंतवणुकीबद्दल बोला, त्या कशा काम करतात, तुम्हाला त्यांची का गरज असते हे सांगा. मूलभूत गुंतवणूक योजना तसेच तुम्ही घेतलेले प्लान्स व पॉलिसीज यांबद्दल  समजून घेण्यास त्यांना मदत करा. यामुळे त्यांना कोणता इन्शुरन्स प्लान खरेदी करणे योग्य आहे याबद्दल एक तथ्यात्मक दृष्टिकोन मिळेल.

●        कागदपत्रे: त्यांना पॅनकार्ड दाखवा, ते कसे दिसते ते दाखवा. त्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी तुम्ही चाइल्ड पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. हे त्यांना भविष्यकाळात कसे उपयुक्त ठरेल हे सांगा. करांचे महत्त्व स्पष्ट करून सांगणे हा आर्थिक शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे.

आर्थिक शिक्षणाच्या दृष्टीने केलेले मार्गदर्शन तुमच्या मुलाला जबाबदार नागरिक होण्यात तसेच जबाबदार व्यक्ती होण्यात मदत करेल. त्यामुळे त्यांचे भवितव्य सुरक्षित होईल तसेच त्यांना पैशाचे निर्णय चातुर्याने घेण्याची क्षमता येईल. बॉब टॅलबर्टच्या शब्दांत- “मुलांना मोजणी करायला शिकवणे चांगले आहे, पण कशाचे मोल अधिक हे समजून घेण्यास शिकवणे सर्वोत्तम आहे.”

अभिप्राय द्या!