जानेवारी ते मार्च तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वृद्धी दर 6.1 ते 5.9 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. परिणामी आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर 7 टक्क्यांच्या खाली जाईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि दुसरीकडे विद्यमान सरकार नव्याने सत्तेत आल्याने जुन्या योजनांना गती देण्यासाठी 6 जून रोजी होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्वितीय द्वि—मासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात थेट अर्ध्या टक्कय़ाची (0.50) कपात होण्याची शक्यता एसबीआयने वार्तिविली आहे. असे झाल्यास मध्यवर्ती बँकेचा रेपो दर 6 टक्क्यांवरून 5.50 टक्क्य़ांवर येण्याची अपेक्षा आहे.
 
आर्थिक वृद्धीदराबाबतची अधिकृत आकडेवारी गुरुवारी प्रकाशित होणार आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने हा अंदाज व्यक्त केला आहे. एकीकडे पुन्हा एकदा महागाईने डोके वर काढले आहे तर दुसरीकडे उच्च व्याजदर यामुळे गुंतवणुकीला मर्यादा येत असल्याने आरबीआय अंदाजे 0.35-0.50 टक्य्यांपर्यंतची व्याजदरात कपात करू शकते.

अभिप्राय द्या!

Close Menu