कर भरण्याविषयी खाली पाच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे:
 
१. फॉर्म-१६, फॉर्म-१६ए आणि फॉर्म-२६एएस दरम्यान रिकंसिलिएशन होणे
 
फॉर्म-१६ व फॉर्म-१६ए हे टीडीएस प्रमाणपत्र आहेत जे डिडक्टीला प्रदान केले जातात. नियोक्त्याद्वारे कर्मचाऱ्याला वार्षिक स्वरूपात फॉर्म-१६ प्रदान केले जाते आणि फॉर्म-१६ए डिडक्टरद्वारे (जसे की बँका) डिडक्टीला तिमाही स्वरूपात प्रदान केले जातात. फॉर्म-१६ए वेतनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या टीडीएससाठी आहे.
 
 अलीकडेच, फॉर्म-१६ भाग-बी च्या स्वरूपात प्रमुख बदल घडून आलेले आहेत. नवीन स्वरूपात एचआरए, एलटीए, ग्रॅच्युइटी इत्यादी सवलतीच्या भत्त्यांविषयी अधिक तपशील द्यावा लागतो आणि कलम ८० कपातीचे तपशील वेगळे नमूद करावे लागतात. तसेच, नियोक्त्यांना आता ट्रेसेस पोर्टलवरून संपूर्ण फॉर्म-१६ म्हणजेच भाग ए आणि भाग बी डाउनलोड करून मग कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
 
 फॉर्म २६एएस हा करदात्याने सरकारला पेमेंट केलेल्या करांचा सारांश आहे. येथे सर्व कर जसे की स्त्रोतावरच कपात केलेले कर, आगाऊ भरलेले कर, भरलेला स्व-मूल्यांकन कर फॉर्म २६एएस मध्ये नमूद केलेले असतात.
 
 फॉर्म-१६ किंवा फॉर्म-१६ए विरूद्ध फॉर्म-२६एएस या फॉर्मवरून टीडीएसचा तपशील आणि उत्पन्नाच्या माहितीचा आढावा महत्वाचे आहे. फक्त तुमच्या फॉर्म २६एएसमध्ये दिसणाऱ्या टीडीएसच्या क्रेडिटची परवानगी आयकर विभाग देतो. तुम्ही आकड्यांना क्रॉस-चेक केल्यावर काहीही त्रुटी नसलेला कर परतावा भरू शकाल. फॉर्म-१६ मध्ये प्रदान केलेली सर्व कपात आयटीआर मध्ये स्वतंत्रपणे आणि अचूकपणे नमूद केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या फॉर्म-१६ ला आपोआप अपलोड करण्यास तुम्ही कोणत्याही एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करणे योग्य असेल, ज्याद्वारे तुमचा परतावा आपोआप तयार करता येईल.
 
 २. तुमच्या उत्पन्नासाठी कोणता फॉर्म योग्य आहे?
 
प्रत्येक आयटीआर फॉर्मच्या स्वत:च्या मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला वेतनाच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असेल मात्र जर तुमचे वेतनापासून उत्पन्न रू. ५० लाखांच्या वर असेल किंवा तुमच्याजवळ एकापेक्षा जास्त घराची मालकी असेल तर तुम्ही आयटीआर-१ वापरू शकणार नाही. जर तुमचे वेतनाचे उत्पन्न रू. ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या वर्षी परतावा दाखल करण्यास आयटीआर-२ फॉर्म वापरावा लागेल.
 
 त्याचप्रमाणे, अलीकडील बदलानुसार कंपनीमध्ये संचालक असलेली व्यक्ती किंवा आर्थिक वर्षादरम्यान कधीही गैर सूचीबद्ध इक्विटी शेअर्स धारण केलेली व्यक्ती आता आटीआर-१ फॉर्म वापरू शकणार नाही. त्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर-२ किंवा आयटीआर-३ वापरावे लागेल.
 
 व्यवसाय किंवा पेशामधून उत्पन्न मिळवणारी एक स्व-रोजगारित व्यक्ती आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कमवलेल्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार त्याचा परतावा आयटीआर-३ किंवा आयटीआर-४ वापरून भरू शकते. एक निवासी व्यक्ती जिने कलम ४४एडी किंवा ४४एडीए अंतर्गत अनुमानित कर योजनेचा स्वीकार केला आहे आणि एकूण उत्पन्न रू. ५० लाखपर्यंत आहे ती आयटीआर-४ फॉर्म भरू शकते. अन्यथा, तिला आयटीआर-३ फॉर्म वापरून आयकर परतावा भरावा लागेल.
 
 ३. आयटीआर भरण्यासाठी प्रक्रिया
 
तुम्ही बरोबर आयटीआर फॉर्म निवडलेला असतांना तुम्हाला फक्त संबंधित फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरण्याची गरज असते. उदाहरणार्थ, तुम्हाला एचआरए, एलटीए सारख्या भत्त्यांना करातून पूर्ण किंवा अंशत: सवलत दिली आहे का याविषयी नवीन आयटीआर-१ फॉर्ममध्ये स्वतंत्रपणे तपशील पुरवणे आवश्यक आहे. तसेच, मानक कपात, मनोरंजन भत्ता आणि व्यावसायिक कर यांनाही नवीन आयटीआर-१ मध्ये स्वतंत्रपणे लिहणे आवश्यक आहे.
जर तुम्ही आयटीआर-२ फॉर्म वापरून आयटीआर भरत असाल तर तुम्हाला एफवाय २०१८-१९ साठी वेतनाचा संपूर्ण ब्रेकअप जसे की मूलभूत वेतन, एचआरए, मुलांचा शिक्षण भत्ता, अनुलाभाचे मूल्य प्रदान करावे लागेल. लक्षात ठेवा, तुम्हाला एफवाय २०१८-१९ मध्ये तुम्ही भारतात किती दिवस वास्तव्य केले यासह तुमची निवास स्थिती स्पष्ट करायची आहे. करदात्याने पुरवलेल्या माहितीच्या आधारे बरोबर आयटीआर फॉर्म आपोआप निवडणारे बरेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत.
 
 जर आयटीआर-१ किंवा आयटीआर-४ तुमच्यावर लागू होत असेल तर तुम्ही परतावा ऑनलाइन तयार करून सादर करू शकता. चिंता करू नका, तुम्ही ऑनलाइन इ-फिलिंग प्लॅटफॉर्मही वापरू शकता, ते यावर्षी सहजपणे तुमची आयटीआर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून देतील.
 
 ४. डेडलाइनकडे लक्ष द्या
 
कोणताही दंड किंवा विलंब शुल्क टाळण्यासाठी तुम्हाला देय तारखेच्या आत म्हणजे ३१ जुलै २०१९ च्या आत तुमचा प्राप्तिकर परतावा दाखल करणे आवश्यक आहे. तुम्हाला कलम २३४ एफ अंतर्गत रू. १०,००० एवढे विलंब शुल्क भरावे लागू शकते.
 
 
सोपे करून सांगायचे म्हणजे, जर तुम्ही यावर्षी (म्हणजेच २०१९) ३१ जुलै २०१९ नंतर मात्र ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी आयटीआर भरला तर रू. ५,००० एवढा दंड आकारला जाईल. डिसेंबर २०१९ नंतर भरल्या जाणाऱ्या परताव्यांसाठी विलंब शुल्क रू. १०,००० पर्यंत वाढवण्यात आले आहे.
 
तथापि, तुमचे एकूण उत्पन्न रू. ५ लाखांपेक्षा जास्त नसेल तर अधिकतम विलंब शुल्क दंड फक्त रू. १,००० असेल.
 
 ५. तुमचा परतावा ई-व्हेरिफाय करा
 
तुम्ही जरी तुमचा परतावा वेळेवर भरलेला असला तरी सुद्धा व्हेरिफिकेशनशिवाय तुमची कर भरण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. तुम्हाला निर्धारित वेळेमध्ये तुमच्या आधार क्रमांकाद्वारे किंवा नेट बँकिंग वापरून तुमचा परतावा ई-व्हेरिफाय करायचा आहे. त्याऐवजी तुम्ही बंगळुरू येथे तुमचा आयटीआर-व्ही (पोचपावती) सीपीसी ला मेल करू शकता. मात्र, स्वाक्षरी केलेली प्रत पाठवण्यापेक्षा ई-व्हेरिफिकेशन लवकर होते. 

अभिप्राय द्या!