आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवा ‘एमएनसी फंड’ बाजारात आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना असून या फंडाद्वारे मुख्यत्वे: एमएनसी कंपन्यांच्या शेअरमध्ये केली जाणार आहे. नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 28 मे ला गुंतवणूकीसाठी खुली झाली आहे. एनएफओची अंतिम मुदत 11 जून आहे.
‘एमएनसी कंपन्या चांगले व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय ब्रॅंड, भक्कम बॅलन्स शीट यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात. याआधीच्या अनुभवानुसारही एमएनसी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे’, असे मत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांनी व्यक्त केले आहे.
आयसीआयसीआय एमएनसी फंडाद्वारे भारतीय मल्टी नॅशनल कंपन्या, भारतात नोंदणी झालेल्या मल्टी नॅशनल कंपन्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडासाठी निफ्टी एमएनसी टीआरआय हा बेंचमार्क असणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंडाचे व्यवस्थापन अनिश तावाक्ले आणि ललित कुमार करणार आहेत. परदेशातील गुंतवणूकीचे व्यवस्थापन प्रियांका खंडेलवाल करणार आहेत.

अभिप्राय द्या!