डेट फंड योजनांच्या परताव्यातील जोखमीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सेबीने ‘साइड पॉकेटिंग’च्या पर्यायास मान्यता दिली आहे. काही फंड हाऊसनी आपल्या योजनांमध्येच या वैशिष्ट्याचा समावेश केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या वित्तीय संस्थांमध्ये फंड कंपन्यांनी गुंतवणूक केली असल्याने रोख्यांच्या परताव्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी फंड कंपन्यांपुढे साइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय उपलब्ध असतो…

..

साइड पॉकेटिंग म्हणजे काय?

डेट पोर्टफोलिओमधील एखादा गुंतवणूक घटक धोकादायक किंवा खराब स्थितीत पोहोचल्यास ती गुंतवणूक अन्य लिक्विड गुंतवणुकीपासून वेगळी करण्याचा मार्ग म्हणजे साइड पॉकेटिंग. या धोकादायक गुंतवणूक घटकामुळे पूर्ण पोर्टपोलिओच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यास साइड पॉकेटचा पर्याय वापरला जातो. बाजारातील चढउतारांमुळे एखाद्या फंडात मोठा हिस्सा बाळगणारे गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडले, तर लहान गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसू शकतो. अशावेळी या पर्यायामुळे छोट्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित रहाते. या पर्यायाचे आणखी फायदे म्हणजे त्याच्या वापरामुळे फंडाचे निव्वळ मत्ता मूल्य (नेट अॅसेट व्हॅल्यू किंवा एनएव्ही) कायम राहते व रीडम्प्शनही थोपवले जाते.

अभिप्राय द्या!