निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी तडफदारपणे संरक्षण विभागाचे कामकाज बघितले आहे.
 
‘रत्नपारखी’ असलेल्या नरेंद्र मोदींनी संसदेच्या सदस्यही नसलेल्या सीतारामन यांना कंपनी व्यवहार आणि वाणिज्यमंत्री करून सर्वांना धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांना अर्थमंत्रीपद देऊन सगळ्यांना धक्का दिला आहे. वर्ष 1970 ते 1971 दरम्यान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून काम बघितला होता. आता जवळपास 48 वर्षानंतर पुन्हा एकदा एका महिलेकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu