मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

अभिप्राय द्या!