कार आणि दुचाकी वाहनांसाठीचा विमा 16 जूनपासून महाग होणार असल्याचे आयआरडीएआयने जाहीर केले आहे. कार आणि दुचाकी वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा बंधनकारक आहे. या विम्याच्या हफ्त्यामध्ये काही श्रेणीतील वाहनांच्या बाबतीत तर 21 टक्क्यांपर्यतसुद्धा वाढ होणार आहे. सर्वसाधारणपणे थर्ड पार्टी विम्याचे दर 1 एप्रिलपासून बदलण्यात येतात. यावेळेस मात्र 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे नवे दर 16 जूनपासून लागू होणार आहेत.
इन्श्युरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) यासंदर्भात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की छोट्या कारसाठी (ज्यांची क्षमता 1,000 सीसीपेक्षा कमी आहे) विम्याच्या हफ्त्यात 12 टक्क्यांनी वाढ होणार आहे. म्हणजेच सध्या 1,850 रुपये असणारा विम्याचा हफ्ता 2,072 रुपयांवर पोचणार आहे. ज्या कारच्या इंजिनची क्षमता 1,000 सीसी ते 1,500 सीसी आहे त्यांच्या विम्याच्या हफ्त्यात 12.5 टक्क्यांनी वाढ होत ते 3,221 रुपये होणार आहेत. ज्या कारची इंजिन क्षमता 1,500 सीसीपेक्षा जास्त आहे त्यांच्या विम्याचा हफ्ता 7,890 रुपये असणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu