नेटबँकिंगच्या माध्यमातून तीन पद्धतीने ऑनलाइन देवघेव केली जाते. ‘आरटीजीएस’ (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम) आणि ‘एनईएफटी’च्या (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर) व्यतिरिक्त ‘आयएमपीएस’च्या माध्यमातूनही ऑनलाइन रक्कम हस्तांतरित केली जाते.

‘आयएमपीएस’ सेवेचे शुल्क उर्वरित दोन सेवांच्या तुलनेत अधिक असते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात ‘आयएमपीएस’चा कोणताही उल्लेख केलेला नाही. ‘आरटीजीएस’च्या मदतीने दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित केली जाते, तर ‘आयएमपीएस’च्या मदतीने केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचेच हस्तांतर करता येते.

अभिप्राय द्या!

Close Menu